बेळगाव शहरातील बहुतेक एटीएम आऊट ऑफ कॅश झाले असून आज संध्याकाळ पासून ही परिस्थिती आहे. यामुळे नागरिकांना पैशासाठी सुरू असलेले एटीएम शोधत फिरायची वेळ आली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी एटीएम चा वापर वाढलेले असताना आज सायंकाळी एटीएम खाली झाले आणि रात्री उशिरा पैसे काढण्यास जाणाऱ्यांना याचा त्रास झाला.
दिवाळीची सुट्टी असल्याने कालपासून एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम झाले नाही तेंव्हा उद्या बँका उघडल्यावरच नागरिकांना पैसे मिळू शकणार आहेत आणि एटीएम मध्ये पैसे भरले जाणार आहेत.
सध्या टिळकवाडी आणि कोर्ट येथील एटीएम मधील पैसे काढावे लागत आहेत. यापुढेही बँकांना दोन ते तीन दिवस सुट्टी असणार असून बँकांनी एटीएम मधून पैसे संपू नव्हेत याची काळजी घेण्याची मागणी लोक करत आहेत.