के यु डब्ल्यू एस चा सहाय्यक अभियंता एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ए सी बी जाळ्यात अडकला आहे.पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते विनायक मकनुरू हे ए सी बी च्या जाळ्यात अडकले आहेत.तब्बल एक लाख रुपयांची लाच स्विकारताना ए सी बी च्या जाळ्यात ते अडकले आहेत.
बेळगाव येथील विश्वेश्वरय्या नगर येथील पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून सोमवारी दुपारी ही कारवाई केली आहे.ठेकेदार सुरेश किराईत नावाच्या व्यक्ती कडून त्यानी एक लाख रुपयांची लाच मागितली होती त्यानुसार ए सी अधिकाऱ्यांनी साफळा रचून पैसे घेतेवेळी त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
ए सी बी पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून अभियंते विनायक मकनुर यांना अटक करण्यात आली आहे.