दिवाळीला किल्ला करण्याची पद्धत आहे. अनेक विद्यार्थी व तरुण आपापले घर व गल्लीत केला बनवतात. शिवकालीन इतिहासाची उजळणी या निमित्ताने केली जाते. या मुले व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव live घेऊन येत आहे भव्य किल्ला स्पर्धा. ग्रुप फोटो विथ किल्ला असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.
मुलांनी आपल्या संख्या सवंगड्यांसमवेत आपण तयार केलेल्या किल्ल्यासोबत एक ग्रुप फोटो काढून बेळगाव live ला पाठवायचा आहे. या प्रत्येक फोटोला बेळगाव live प्रसिद्धी देणार असून आपण केलेला किल्ला जगभरात पोहोचवणार आहे.
एवढेच नव्हे तर संपूर्ण शहर ग्रामीण भागात सर्वोत्कृष्ट किल्ला निर्माते महाविजेता पदक व रोख पाच हजाराचे बक्षीस मिळवतील. बेळगाव उत्तर विभागात तीन आणि दक्षिण विभागात तीन आणि ग्रामीण भागात तीन उपविजेत्यांनाही बक्षीस व रोख रक्कम दिली जाईल.
या स्पर्धेला प्रवेश फी नाही आणि सहभाग घेणाऱ्या प्रत्येक समूहाला मिळेल बेळगाव live कडून प्रमाणपत्र. जिल्हा पंचायतचे शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
मग लवकर पाठवा आपला ग्रुप फोटो विथ किल्ला आमच्या या 7899816165 व्हाट्सएपच्या क्रमांकावर.
स्पर्धेच्या नियम व अटी:
14 नोव्हेंबर च्या आत प्रत्येकाने किल्ला ग्रुप फोटो किंवा सेल्फी विथ किल्ला फोटो पाठवायचा आहे
किल्ल्याचे नाव-तयार करणाऱ्या मुख्य चार मुलांची नाव मोबाईल नंबर-किल्याची ऐतिहासिक माहिती या सोबत तुम्हाला पाठवायची आहे
प्रत्यक्ष निरीक्षण परीक्षक पहाणी केल्यावर महाविजेता आणि इतर बक्षिसे घोषित कऱण्यात येतील- स्पर्धा आयोजकांचा निर्णय अंतिम राहील
एकच किल्ला दोनदा दुसऱ्यांनी पाठविल्यास बाद ठरवला जाईल.
Nice