कर्नाटक परिवहन महामंडळाने कंग्राळी येथे वेळेत आणि सूरळीत बस पुरवठा केला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी रास्तारोको करून निषेध व्यक्त केला होता. परिवहनाने लवकर बस सोडू असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळले आहे. कंग्राळी गावाला बस सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी ही बस सोडण्यात आली आहे. यावेळी बसचे स्वागत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर आय पाटील होते. रास्ता रोको केल्यावर विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. मागील अनेक दिवसापासून येथील बस सुरळीत चालू झाल्या नव्हत्या. जर बस सुरळीत सुरू झाल्या नाहीत पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता. याची दखल घेण्यात आली आहे.
कंग्राळी खुर्द गावावरून जाणाऱ्या बस ही येथे थांबवत नाहीत तसेच येथील वाहकही विद्यार्थ्यांशी चांगली वर्तवणूक करत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. सध्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या गावाला सकाळच्या सत्रात ४ बसफेऱ्या व सायंकाळच्या सत्रात ४ बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. विद्यार्थी व नागरिकांची हेळसांड होणार नाही याची काळजीही घेण्यात यावी, असे सांगण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनी या गावाला बस पोहचू नये, यासाठी प्रयत्न केल्याची माहितीही मिळाली आहे.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, एपीएमसी चे पोलीस निरीक्षक जे एम कालिमिर्ची, आर आय पाटील, चेतक कांबळे, तालुका पंचायत सदस्या मनीषा पालेकर, ग्राम पंचायत अध्यक्ष चंदा पाटील, यल्लप्पा पाटील, सचिन शिवणगेकर, महेश पालेकर, महेश खंडागळे, सुनीता जाधव, उमेश चौगुले, पुंडलिक पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.