बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना काँग्रेस पक्षाने मोठा धक्का दिला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला विंग च्या राज्य अध्यक्ष हे पद त्यांच्याकडून काडून घेण्यात आले आहे. या जागी डॉ बी पुष्पा अमरनाथ यांची नियुक्ती झाली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी केली ही निवड जाहीर केली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार झाल्या आहेत त्यांच्याकडील हे पद काढून घ्यावे अशी मागणी केली होती. महिलांनी यासाठी आंदोलन सुद्धा केले होते. अनेकांनी ही मागणी केल्याने हे प्रकरण माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे गेले होते.
पक्षाच्या दिल्ली कार्यालयात चर्चा होऊन आता हे पद काढून घेण्यात आले असून हा लक्ष्मी आक्का साठी धक्काच आहे.डॉ पुष्पा अमरनाथ या मैसूरू च्या जिल्हा पंचायत माजी अध्यक्षा असून त्यांनी ए आय सी सी वर काम केलं आहे. या अगोदर त्यांनी राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस म्हणून काम केलं आहे हनसुर आमदार एच पी मंजुनाथ यांच्या जवळच्या नातलग आहेत.