एक नोव्हेंबर काळ्यादिनी लाठी हल्ला का झाला? कसा झाला? आणि त्याचं स्वरूप मोठं व्हायला कुणी दिलं नाही? यात समिती नेते पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका कशी होती? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.बेळगाव लाईव्ह ने देखील लाठी हल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय.
काळादिन असो किंवा आणि कुठले मराठीचे आंदोलन बेळगावात मार सोसतो तो मराठी माणूसंच… लाठी खाणे जणू काही बेळगाव लढ्याचे समीकरण बनले आहे.मूक सायकल फेरी गोवावेस कडे आली असताना समिती नेतृत्व द्विधा मनस्थितीत होते, सभा मराठामंदिरात घ्यायची की गोवावेस सर्कलला घेऊन सांगता करायची तेवढ्यात टिळकवाडी भागातील शहरात जाण्यासाठी लाल पिवळा ध्वज घेऊन जाणारे युवक या मिरवणुकीच्या जवळ आले तेंव्हा पासूनच गोंधळास सुरुवात झाली. वास्तविक कन्नड भाषिक कार्यकर्त्यांना आर पी डी जवळ अडवून दुसऱ्या रस्त्याने पाठवलं असत तर लाठी मार करण्याचा प्रसंगच आला नसता मात्र एका ज्युनियर पोलीस अधिकाऱ्यां कडून चूक झाली करवे कार्यकर्ते तिथं आले अन त्या नंतर सगळं घडलं.
लाठी हल्ल्याची तीव्रता कमी करण्यास दोन माणसं जबाबदार आहेत त्या दोघांना याचं श्रेय द्यावं लागेल..करवे कार्यकर्ते दाखल होताच मार्केट पोलीस आयुक्त एन व्ही बरमनी यांनी त्या करवे कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेत त्यांना हुसकावून लावलं त्यामुळं वातावरण तापलं या नंतर डोळ्यांचे पारणे बंद होण्याच्या आत मोठया पोलीस अधिकाऱ्यांचा आदेशाची वाट न बघता बंदोबस्तास असणाऱ्या कन्नड धार्जिण पोलीस कॉन्स्टेबलनी लाठीचा प्रहार सुरू केला तेवढयात एक पोलीस अधिकारी आणि एक समिती युवा नेत्यांने घटना आवरायचा प्रयत्न केला.
खरं तर गर्दीला आणि चिडलेल्या पोलिसांना आवरणं कठीण असतं मात्र मार्केट ए सी पी बरमनी आणि समितीचे युवा नेते मदन बामणे यांनी सदर घटनेवर नियंत्रण आणलं.मागील अनेक लाठी हल्ला प्रकरणी बरमनी यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातं मात्र यावेळी लाठी हल्ला सुरू केलेल्या त्या सर्व जुनियर अधिकारी पोलीस कॉन्स्टेबलना लाठी मार करण्यापासून रोखले आणि तिथेच घटनेवर नियंत्रण आलं पुढे मोठा अनर्थ टळला.
जुलै २००९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या मोर्चात लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांची उडी मारून काठी पकडलेले संभाजी पाटील त्या घटने पासून काँग्रेस मधून समितीच्या मार्गावर आले .घटना लहान होती पोलिसांची काठी झेप मारून काढून घेतली त्याच घटनेने त्यांना समितीत स्थान व बळकटी मिळाली अन ते आमदारकी पर्यंत पोचले त्याच वृत्तीने मदन बामणे यांनी लाठी हल्ला होत असतेवेळी धाडसाने पुढं पुढं जाऊन बरमनी यांच्या सोबतीनं जोरदार प्रतिकार करत लाठी हल्ला थांबवला.बामणे यांनी दाखवलेल्या धाडसाने मोठा लाठी मार थांबला याची चित्रणे सर्वत्र उपलब्ध आहेत.
समितीत युवकांना संधी द्यावी ही मागणी जोर धरत असताना बामणे सारख्या समितीच्या युवा कार्यकर्त्याने साहस दाखवून लाठी मार रोखण्यात मोलाची भूमिका बजावणे हे मध्यवर्ती अध्यक्षाना आवाहन आहे त्यांनी अश्या युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावं हीच अपेक्षा!!
हे कर्नाटक सरकार व कानडी मीडिया यांना मराठी व मराठी भाषिक यांचा पोटशूळ आहे
आणि यांचा मेंदू गुढग्यात आहे. बेळगांव च्या मराठी माणसांना या आंदोलनासाठी मानायलाच पाहिजे जो लढा त्यांनी कधी ही वीजू दिला नाही एक दिवस बेळगावं नक्की कर्नाटकातून मुक्त होईल.आणि होणारचं ,
जय महाराष्ट्र, जय शिवराय,
Enough is enough…It’s high time to get the case mentioned in Supreme Court. We Marathas will definitely get justice.CJI is the most trustworthy
Jai maharashtra