लोकशाही आणि न्यायाच्या मार्गाने ६२ वर्षे १ नोव्हेंबर ला मूक सायकल फेरी काढण्यात येते पण यंदा सकाळी पर्यंत या फेरीस परवानगी मिळालेली नव्हती.आत्ता सकाळी सात वाजता परवानगी देण्यात आली आहे.
मध्यवर्ती म ए समितीचे नेते परवानगी साठी पोलीस आयुक्त कार्यालयात रात्रभर बसून होते पण परवानगी मिळाली नव्हती.मात्र तांत्रिक अडचणी दूर करून आता परवानगीचा कागद दिला आहे. अशी माहिती पी आर ओ विकास कलघटगी यांनी दिली.
काल परवानगी मागायला गेलेल्या नेत्यांना प्रत्येकी पाच लाखाचे हमीपत्र आणून द्या असे पोलीस दलाने सांगितले होते. या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यावर शुक्रवार दि २ ला पुढील सुनावणी होणार आहे. याचा फटका परवानगीवर बसण्याची शक्यता निर्माण झाली होती.
त्यामुळेच रात्रभर परवानगी दिली गेली नव्हती अशी माहिती मिळत आहे पण रात्रभर प्रयत्न करून समिती नेत्यांनी ती मिळवली आहे.
विकास कलघटगी, प्रकाश मरगाळे, विजय पाटील आणि प्रकाश पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ही परवानगी मिळवली आहे. डीसीपी सीमा लाटकर व एसीपी एन व्ही भरमनी यांनी येऊन ही परवानगी दिली आहे.
स्वतः पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी संपर्क साधून पोलीस दलाचे सहकार्य राहील मूक फेरी शांततेत करा असे आवाहन केले आहे.
सकाळी साडे नऊ ते दुपारी एक पर्यंत ही परवानगी असून संभाजी उद्यान मधून या मूक सायकल फेरीस सुरुवात होणार आहे