नवरात्री निमित्त शहर परिसरातील महा लक्ष्मी दुर्गामाता अश्या अनेक मंदिरांची माहिती आम्ही बेळगावं live च्या वाचकांना देत आहोत. याचाच भाग म्हणून बसवणं गल्लीच्या लक्ष्मी देवी मंदिराची माहिती आम्ही देत आहोत
प्रत्येक गावाला एक ग्राम देवी असते तशी ग्राम देवी बेळगावं शहराला देखील आहेत बसवाण गल्लीतील लक्ष्मीदेवी म्हणजे बेळगावची ग्रामदेवता आहे.शेकडो वर्षाची परंपरा या लक्ष्मी मंदिराला लाभली आहे.बेळगावावर राज्य केलेल्या राष्ट्रकूट साम्राजपासूनचा मंदिराला इतिहास आणि परंपरा आहे.
पूर्वीपासून कोणतेही घरी शुभ कार्य असेल तर प्रथम ग्राम देवता लक्ष्मीदेवीला प्रथम वंदन करून ,पूजा करण्याची परंपरा आहे.नवरात्रात देवीची नऊ दिवस दररोज वेगवेगळी पूजा बांधली जाते.देवीच्या नऊ दिवसातील विविध रूपाचे दर्शन घेण्यास भाविकांची रीघ लागलेली असते.लक्ष्मी कुमार कम्मार हे या देवीच्या मंदिराचे पौरोहित्य करत असतात गेल्या कित्येक पिढ्या त्यांनी हे काम करत आलेत.
शिवाय पूजा,अलंकार,महानैवेद्य देखील देवीला दाखवला जातो.नवसाला पावणारी आणि इच्छापूर्ती करणारी देवी म्हणूनही ग्रामदेवतेचा लौकिक आहे.दर मंगळवारी आणि शुक्रवारी देखील देवीच्या दर्शनाला भाविक गर्दी करतात.