तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून सुळेभावीचे महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून नावलौकिक असल्याने भाविकांनी संपूर्ण मंदिराला नाण्यांनी मढवले आहे.
ज्यांचा नवस पूर्ण झाला त्यांनी 1,2,5,10 रुपयांची नाणी मंदिरांच्या खांब्याना मढवून पूर्तता केली असल्याने दिसून येते. नवरात्रीत रोज प्रवचन, धर्मीक विधींची रेलचेल असते. दशमीला पालखी मिरवणूक आणि सीमोल्लंघनाने सांगता होते.
दर 5 वर्षानी देवीचा यात्रोत्सव होतो. एकदा मंदिरात तर 5 वर्षानंतर मैदानात देवीची गदगीवर बसवून यात्रा केली जाते. श्रावण, नवरात्र तसेच अमावस्याला भाविकांची गर्दी असते. मंदिर कमिटीने 35 वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारले आहे. भाविकांना दर्शनासाठी आवशक सोय केली आहे.
दर मंगळवार,शुक्रवार अमावस्या पौर्णिमेला बेळगाव शहरा सह दूर दूर हुन हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात.बेळगाव भागात सर्वात जास्त नवसाला पावणारी देवी म्हणून सुळेभावीची महालक्ष्मीची ख्याती आहे.या मंदिरामुळे गावाचाही लौकिक वाढला आहे.