गेली दोन वर्षे बेळगाव शहराचे महापौर व उपमहापौर १ नोव्हेंबरच्या निषेध सायकल फेरीत सहभागी होताना तोंडावर काळी पट्टी बांधून सहभागी होत आहेत .परंतु आता ती पट्टी तोंडाला न बांधता दंडाला बांधावी आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कानूसार आपली भूमी व ६२ वर्षाच्या लढ्याची व्यथा मांडून उपमहापौर या नात्याने दिल्ली पर्यंत पोचवावी अशी मागणी काही सूनिल बाळेकुंद्री , मदन बामणे , रवि निर्मळकर , सूरज कणबरकर या समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी केली आहे.
समस्त सीमाभाग आपल्याकडे डोळे लावून वाट पहात आहे की आपण कधी तोंड उघडून आमची व्यथा मांडनार !ज्या पद्दतीने आपन आपले हेवेदावे बाजूला ठेवून सिमाभागातील मराठी जनता व दबाव गटाच्या आग्रहाला मान देवून २०१६ व १९१७ यावार्षी मराठीच महापौर केला. त्यांच पद्द्तीने सीमाभागातील मराठी जनतेचा व दबावगटाचा आपल्याला आग्रह आहे आपण तोंडावरची पट्टी बाजूला करा असेही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उपमहापौर यांच्या सह सर्व मराठी नगरसेवकानी आपले व्यवहार बंद ठेवून फेरीत सहभागी व्हाअसे आवाहन त्यांनी केलं आहे.