एक लहान मुलगी आणि तिचे कुत्र्याचे पिल्लू यावर आधारित व्हेनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट हा चित्रपट लवकरच येत आहे. अशा विषयावर येणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्याचे संगीत संयोजन बेळगावच्या शंतनू नंदन हेर्लेकर याने केले आहे.
या चित्रपटातील तीन गाण्यांचे संयोजन शंतनू याने केले आहे. यापूर्वी विविध लघु चित्रपटासाठी त्याने हे काम केले आहे. त्याला जन्मल्यापासून संगीताचा वारसा मिळाला आहे. संगीत पंडितांच्या घरी तो जन्माला आला.
वडील नंदन हेर्लेकर हे त्याचे पहिले गुरू. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांच्याकडे तो शिकला. भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून संगीत अलंकार ही पदवी त्याने मिळवली आहे. इलेक्टरोनिक संगीत निर्मितीचा डिप्लोमाही त्याने केला आहे. शंकर महादेवन अकादमीत त्याने संगीत शिक्षक पदीही काम केले आहे.