‘माझ्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेच मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सूचनेनुसार मी काम करणार अश्या शब्दात बेळगावचे महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी कानडी संघटनांना घरचा आहेत दिलाय.
आगामी एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पाश्वभूमीवर रविवारी शहरातील विविध कानडी संघटनांच्या प्रमुखांनी महापौर बसप्पा चिखलदिनी यांची भेट घेतली त्यावेळी कन्नड संघटनाना घरचा आहेर मिळाला आहे.
महापौरांच्या नेतृत्वात कन्नड संघटनांचे शिष्टमंडळ बंगळुरूला जाऊन बेळगाव राज्योत्सवा साठी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना आमंत्रण देऊया आणि एक कोटींचा निधी राज्योत्सव मिरवणुकीसाठी मागणी करू असं साकडं महापौराना घातलं त्यावर महापौरांनी हात झिडकारल्याने उतावीळ कन्नड संघटनांचा हिरमोड झाला आहे.
चिखलदिनी यांनी कानडी संघटनांच्या प्रस्तावाचे स्वागत केलं असलं तरी या विषयावर जो पर्यंत रमेश जारकीहोळी यांच्या कडून सूचना येत नाहीत तोवर काहीच करणार नसल्याच त्यांनी म्हटलंय.