शहराची मिनी व्हॉलसेल मार्केट राजस्थानी पर प्रांतीय व्यापाऱ्यांचा गड समजला जाणाऱ्या पांगुळ गल्लीच्या रस्ता रुंदी करणास अखेर मुहूर्त सापडला असून शनिवारी सकाळी महा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्टर प्लॅन चे मार्किंग केले आहे.
4
पांगुळ गल्लीत सर्व प्रकारचे व्होलसेल मार्केट उपलब्ध आहे शहर परिसरातील लहान मोठे व्यापारी या गल्लीत खरेदीसाठी येत असतात शहरातील रामलिंग खिंड गल्ली गणपत गल्ली खडे बाजार सारखा बाजार असणाऱ्या गल्ल्यांचे रुंदीकरण झाले मात्र कित्येक वर्षा पासून पांगुळ गल्लीचे रुंदीकरण खितपत पडले होते शेवटी काल महापौर अधिकाऱ्यांच्या बैठकीत पांगुळ गल्लीचे रुंदीकरण 30 फूट रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
शनिवारी पालिकेच्या अभियंत्यांनी मार्किंग केलं पांगुळ गल्लीतील बहुतेक व्यापाऱ्यांनी 30 फूट राखीव जागा सोडून इमारत परवाने मिळवले आहेत त्यामुळं अधिकाऱ्यांच्या फूट रूंदीकरणं विरोध केला त्यामुळे 30 फूट मार्किंग करण्यात आले. सर्व दुकानदारान 12 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्या नंतर रुंदीकरण कामास दिवाळी नंतर सुरुवात होणार आहे..यावेळी स्थानिक नगरसेवक वाझ देखील उपस्थित आहेत