जे लोक काळ्यादिनास परवानगी देवू नये अशी वल्गना करतात त्यांनी इतिहास जाणून घेतला पहिजेत .
या काळ्यादिनाच्या फोटोला एक वेगळा इतिहास आहे . १ नोव्हेंबर १९५६ रोजी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या विरोधा संयुक्त महाराष्ट्र चौकातून मूक फेरीला सुरूवात झाली .
(1 नोव्हेंबर 1956 च्या काळ्या दिनाचा हा फ़ोटो)
१ नोव्हेंबर १९५६ पासून आज १ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कधीही कर्नाटक राज्योत्सवाच्या विरोधात काळादिन पाळला गेला नाही अथवा तो पाळला नाही आजही अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या केंद्र सरकारचा सीमावासिय काळादिन या स्वरूपात निषेध करतात पण जे आजचे कर्नाटक सरकार आमच्या कडून आमचा घटनेने दिलेले हक्क व अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो व लोकशाहीला फासावर चढवते त्याबद्दल आम्ही म्हैसूर (कर्नाटक)सरकारचा निषेध करत असतात.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी आम्हाला आमच्या मनाविरुद्ध दुसऱ्या भाषेच्या राज्यात डांबण्यात आले. परंतू १ नोव्हेंबर १९६३ पर्यंत राज्योत्सव बेळगावसह सिमाभागात साजरा केला जात नव्हता . काळादिन हा राज्योत्सवाच्या आधी ९ वर्षा पासून गांभीर्याने पाळला जतो .त्यामूळे गेली ६३ वर्षे लोकशाही मार्गाने बेळगाव व समस्त सिमाभागातील मराठी जनता केंद्र सरकारला आपली लोकेछा दाखवते हे विशेष! आणि आजही केंद्र सरकार धुतराष्ट्रासारखे डोळ्याला पाट्टि बांधुन दिल्लीत बसले आहे पन आम्ही आमची जिद्द सोडणार नाही. आम्ही देशातील सर्व भाषांचा आदर करतो पण आमच्या मराठी भाषेचा कुणी द्वेष करत असेल तर त्याना आमच्या मराठी अस्मितेच्या नाक घालून पाया पडल्याशिवाय सोडणार नाही . जो पर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्यात आम्ही समाविष्ट होत नाही तो पर्यंत बेळगावातील मराठी माणूस स्वस्थ बसणार नाही .
-सूरज कणबरकर
बेळगाव