स्वामी विवेकानंदांनी बेळगावला भेट दिली होती त्यावेळी त्यांचा १६ ते २७ ऑक्टोम्बर १८९२ असा बारा दिवस बेळगावात मुक्काम होता.यावर्षी स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १२६ वर्षे झाली आहेत. त्या निमित्ताने रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे २७ आणि २८ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमात शनिवार दि.२७ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सायंकाळी साडे सहा ते साडे आठ वाजेपर्यंत संजय देशपांडे यांच्या सितार वादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.देशातील नामवंत सितार वादकामध्ये त्यांची गणना होते.त्यांच्या सितार वादनाच्या सहा सीडी प्रकाशित झाल्या आहेत.देश विदेशात अनेक ठिकाणी संजय देशपांडे यांच्या सितार वादनाचे कार्यक्रम झाले आहेत.
रविवार दि.२८ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सायंकाळी साडे सहा ते साडे आठ दरम्यान प्रसिद्ध गायक भालचंद्र नाकोड यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.वडील पंडित अर्जुनसा नाकोड यांच्याकडून त्यांना गायनाचा वारसा लाभला आहे.धारवाड आकाशवाणीचे ते अ दर्जाचे कलाकार आहेत.स्वरावरील हुकूमत आणि आवाजातील गोडवा हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.