बेळगावात मराठी नष्ट करण्यासाठी एकीकडे कर्नाटक सरकार चांगलेच प्रयत्न करत आहे. पण तेच कर्नाटक सरकार सौदती तालुक्यात असलेल्या आणि भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या जोगन भावी येथे मात्र मराठीत फलक लावते. कर्नाटक सरकारने कितीही प्रयत्न केले तरी धार्मिक ठिकाणी तरी का होईना मराठी फलक लावावेच लागतात हे स्पष्ट आहे.
यल्लमा देवी बरोबरच जोगन भाविलाही हजारो भाविक जात असतात. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाबरोबरच इतर राज्यातील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. हा भाग जरी कर्नाटकात आला तरी मराठी भाविक येथे अधिक प्रमाणात येत असंल्याने येथील नागरिकांनी स्वच्छतेचे फलक मराठीत लावले आहेत. त्यामळे येथील मराठी पण कमी करू शकत नाही, असे दिसून येत आहे.
मराठीला कमी लेखण्यासाठी कर्नाटक सरकार बरेच प्रयत्न करत आहे. मात्र ते कमी होणार नाही. वारंवार कर्नाटक सरकार जे प्रयत्न करत आहे त्याला पुरून मराठी चा प्रभाव वाढत आहे. जोगन भावी येथे प्रत्येक ठिकाणी मराठी आणि कन्नड फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून येणाऱ्या भाविकांना याचा चांगलास फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
अशीच भूमिका कर्नाटक सरकारने सीमाभागात राबवल्यास मराठी माणसांच्या मनातील संताप दूर होऊ शकेल.