राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार झाला आहे.पुणे बंगळुरू हायवेवर उज्वल नगर जवळ हा मंगळवारी रात्री हा अपघात घडला आहे.
अल्लउद्दीन मोमीन वय 62 रा.उज्वल नगर बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अल्लउद्दीन हे आझाद नगर कडून वैभव नगर कडे चालत जात होते त्यावेळी हायवेवर वेगात जाणाऱ्या कार ने त्याना धडक दिली त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.रहदारी उत्तर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्याच्या आमदार पुत्राच्या बी एम डब्ल्यू कारने युवतीला चिरडले होते त्यानंतर संतप्त जमावाने कार जाळली होती त्या नंतर कार जाळून हल्ला केलेल्या वर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हायवे क्रॉस करणे चुकीचे असताना अनेक पादचारी आझाद नगर कडून उज्वल नगर कडे हायवे ओलांडून जात आहेत पोलिसांनी बऱ्याच ठिकाणी बॅरिकेट्स लावले असताना देखील हायवे ओलांडला जात आहे त्यामुळे हे अपघात होत आहेत.हायवे ओलांडण्यासाठी ओव्हर ब्रिज चा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ट्रॅक्टर दुचाकी अपघातात एक ठार
ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बेळगाव बागलकोट रोड वर मारिहाळ येथे घडली आहे.बसवराज अक्की वय 50 रा.मारिहाळ असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे.
मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पवणे आठच्या सुमारास हा अपघात घडला आहे घटनास्थळी मारिहाळ पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केलाय.मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झालाय.