Sunday, December 22, 2024

/

सीमा प्रश्नी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन’

 belgaum

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश बदलले असून कोर्ट कामकाजाला गती द्यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

Mes delegation
बुधवारी रात्री बेळगाव विमान तळावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.बुधवारी दिवसभर कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा दौरा करून विमान मार्गे मुंबईकडे जात असताना बेळगाव विमान तळावर समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी खटल्यातील वकिलांशी संपर्क साधावा  व कोर्ट कामकाजाला गती ध्यावी अशीही मागणी केली त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ अस आश्वासन दिलं.यावेळी समनवयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे,अरविंद पाटील,विकास कलघटगी,राजू मरवे प्रकाश बापू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.