तालुक्यातीक उत्तर भागातील एका मोठया ग्राम पंचायत मध्ये संगणक उताऱ्यासाठी तब्बल 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. एका ग्राम विकास अधिकाऱ्याच्या या प्रतापामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही एकच घटना नसून असे प्रत्येक व्यक्तीकडे अशी मागणी करण्यात येत आहे. यावर ग्राम पंचायत सदस्यांनीही कानाडोळा केल्याचेच दिसून येत आहे
नुकतीच तालुका पंचायतच्या पीडिओ आणि तालुका पंचायत सदस्यांमध्ये संगणक उताऱ्यावरून चांगलीच खडाजंगी झाली होती. निलेश चंदगडकर यांनी याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे सरकारी कायद्यात बसते त्या प्रमाणे संगणक उतारे देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याला पीडिओनी पाने पुसण्याचे काम केले आहे.
बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील एका मोठ्या ग्राम पंचायत मध्ये उताऱ्यासाठी ३० हजारांची मागणी करण्यात आली आहे. सध्या तो उतारा तयार असून पीडिओने पहिला पैसे नंतरच उतारा देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या पीडिओवर कारवाईची मागणी होत आहे
असे प्रकार दररोज करण्यात येत असून याकडे ग्राम पंचायत सदस्यांचे दूर्लक्ष करण्यात येत आहे. स्मार्ट विलेजमध्ये सद्या त्या गावाचा समावेश असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे