ब्रिटीशां विरुद्ध लढलेल्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांची आज जयंती आहे. ब्रिटिश कलेक्टर वर विजय मिळवून त्यांचे पॉलिटिकल एजंट जॉन यांचा वधही त्यांनी याच दिवशी केला होता यामुळे विजय दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
राणी चन्नम्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ रोजी झाला होता आणि ब्रिटिश सैन्याचा पाडाव त्यांनी २३ ऑक्टोबर १८२४ मध्ये केला होता. भारताची ब्रिटिशांविरुद्ध लढणारी पहिली महिला योद्धा ही त्यांची ओळख आहे. एकाकीपणे त्या ब्रिटिश दलासमोर रणरागिणी प्रमाणे उभ्या राहिल्या होत्या.त्या ब्रिटिशांना हाकलवून लावण्यात यशस्वी झाल्या नाहीत पण अनेक महिलांना जागे करण्यात त्यांनी यश मिळवले होते.
आपले राज्य आणि देश वाचवण्यासाठी झटून स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेल्या या वीर राणीचे समरण आज गौरवाने करणे हीच त्यांना गौरवांजली ठरते.