मागील चार ते पाच वर्षांपासून उद्योग खात्री योजनेत ग्राम विकास अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. कामगारांवर जो समूहप्रमुख निवडण्यात येतो त्याला प्रत्येक महिले मागे तीन रुपये देण्याचा आदेश असताना ते दिले जात नाहीत, ते द्यावेत ,अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. २०१३ मध्ये कायद्याच्या चौकटीतच लिहिलेले आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. याकडे लक्ष वेधले गेले.
याबाबत संबंधित ग्राम पंचायत विकास अधिकारी कारणीभूत असून त्यांनी हा सर्व पैसा लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक ग्राम पंचायत मध्ये प्रत्येक महिलेमागे समूह प्रमुख यांना पैसे देण्यात येत नसून हा भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी कुळी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या ना निवेदन दिले. तसेच तालुका पंचायतलाही निवेदन देण्यात आले आहे.