कोंबडीला दोन पाय असतात हे सर्वश्रुत आहे मात्र बेळगाव तालुक्यातील एका फार्म हाऊस मधल्या कोंबडीला चक्क चार पाय असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजारात चिकन घेताना दोन्ही तंगड्या ठेवा असे म्हटले जाते पण ही कोंबडी घेणाऱ्याला तिचे चार पायही मिळतील, आश्चर्य आहे…. निसर्गाची किमया दुसरे काय……
चिरमुरी येथील बाळू जाधव यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या फार्म हाऊस मधील एका कोंबडीच्या पिल्लास चार पाय आहेत त्यामुळे ही चार पायांची कोंबडी पहायला गर्दी होत आहे.
बाळू जाधव यांचा चिरमुरी येथे पोल्ट्री फार्म आहे त्यांच्या फार्म मध्ये तब्बल तीन हजार कोंबड्या आहेत गेल्या दीड महिन्या पूर्वी त्यांनी कंपनी कडून कोंबड्यांची पिल्लं मागवली होती सुरुवातीला चार पायांची कोंबडी निदर्शनास आली नव्हती मात्र सोमवारी कोंबड्या हाताळतेवेळी चार पायांची कोंबडी निदर्शनास आली.
ग्लोबल वार्मिंगच्या युगात क्लोन करून वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात असताना चार पायांची कोंबडीची उत्पत्ती ही निसर्गाचा चमत्कार म्हणावे लागेल. ही कोंबडी आकर्षण बनत आहे तुम्हीही चिरमुरीला गेलात तर बघून या ही चार पायाची कोंबडी.