एक नोव्हेंबर काळा दिनी मूक फेरीत सहभागी होऊन केंद्र सरकारला पुन्हा एकदा आपली अस्मिता दाखवा असे आवाहन शहर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.सुरुवातीला माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश्य स्पष्ट केला.
समितीचा लढा युवकांनी हातात घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन दिपक दळवी यांनी केले तर युवा कार्यकर्ते मदन बामणे यांनी युवक समितीच्या लढ्यात गेली सक्रिय असून काळ्या दिनात गेल्या चार वर्षात विक्रमी सहभाग असल्याचे सांगितले.अध्यक्षांनी युवकांनी लढा हातात घेण्यास पुढे यावे असे आवाहन केले असले तरी युवक लढ्यात काळ्या दिनात सक्रिय आहेत याची जाणीव करून दिली. अरुण कानूरकर यांच्या सह आदींनी आपापले विचार मांडले.युवकांनी सोशल मीडियाचा वापर एकमेकांची बदनामी न करता चांगल्या साठी करा असे आवाहन देखील करण्यात आले.