कणबर्गी गावामध्ये एक महिलेचा गळा दाबून खुन करण्याची घटना शुक्रवारी घडली होती. हा खून करणारा त्या महिलेचा पुतण्याच असल्याचे उघड झाले असून घराच्या जागेच्या वादातून हा खून करण्यात आला आहे.
माळमारुती पोलिसांनी २४ तासात या खुनाचा शोध लावून मयत महिला सावित्री भरमा पाटील ( वय ४०) रा. कणबर्गी हीचा पुतण्या सुधीर यल्लाप्पा देशनूर (वय २७) यास अटक केली आहे.
सदर महिला मृतावस्थेत सापडल्यानंतर माळमारुती पोलिसांनी पुढील तपास सुरू केला होता.
या घटनेमागे घराच्या जागेचा वाद होता हे स्पष्ट झाले आहे. कोणत्या कारणासाठी हा खून करण्यात आला याचा लवकरात लवकर लागण्यासाठी मार्केटचे एसीपी एन व्ही बरमनी व माळमारुती पोलीस स्थानकाचे सिपीआय बी आर गड्डेकर यांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.