सुकोमल चेहरा आणि फुटलेल्या टाचा, भेगाळलेली पावल, खरबरीत हाताचे खरबरी कोपरे असा विचारसुध्दा केवढा रफ वाटतो ना. आता आला हिवाळा! टिव्हीवर व्हॅसलिनपासून अक्षरशः अगणित क्रिम्स, लोशनच्या जाहिरातींचाा मारा कधीच सुरू झाला आहे. का बरं हिवाळ्यात त्वचा इतकी रूक्ष होते? थंडीत घामाचे प्रमाण कमी होते. एकूणच त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्वचा भेगाळल्यासारखी होते. शरीरातील पाणी लघवीवाटे जास्त व घामाव्दारे कमी बाहेर पडते. हे झालं एकंदर त्वचेच. ओठ फुटणे, टाचा फुटणे हे अगदी सामान्य कायम आढळणारे विकार आहेत. कितीतरी स्त्रिया टाचा फुटणे हा एक अविभाज्य भाग आहे असे समजून कोणतेही उपाय करत नाहीत. चेहर्याला लावायला हरतर्हेची क्रिम,पावडर आणतील पण पाय, टाचा मात्र दुर्लक्षितच.
टाचांना भेगा पडत पडत आतला मांसल भाग दिसू लागतो. रक्त येऊ लागते. काही प्रकारच्या इसबमध्ये टाचा, पावलं भेगाळतात, खाज येते, रक्त येतं, पाणी येतं, सोरियासीसमध्येसुध्दा टाचा, पावलं पाय रूक्ष होऊन सोलवटायला लागतात. त्वचा विकारांमध्ये टाचा, पावलं पाय रूक्ष होऊन सोलवटायला लागतात. त्वचा विकारांमध्ये त्वचा जाड आणि रखरखीत बनते.
ओठांवर, ओठांच्या कोपर्यांवरसुध्दा भेगा पडतात हिवाळ्यात असे होणे साहजिक आहे. पण काही व्यक्तींना इतर ऋतुंमध्ये सुध्दा असा त्रास होतो. तेव्हा जीवनसत्वांचा अभाव व डिहायड्रेशनमुळै असा विकार होऊ शकतो. इतर त्वचाविकारांचा विचार करणेसुध्दा आवश्क असते.
उपचार- आहारात स्निग्ध पदार्थांचा पुरसा समावेश असणे, सर्व जीवनसत्वे असणारा सात्विक आहार घेणे, ज्यात सालीसकट डाळी, मोड आलेली कडधान्ये क जीवनसत्वयुक्त भाज्या व फळे असणे आवश्यक असते.
उपचार- कोकम तेल, खोबरेल असे स्निग्ध पदार्थ लावून त्वचा मऊ ठेवता येते. पेट्रोलियम जेली (किंवा व्हॅसलसीन, बायोलीनसारखे इमॉलीयंट म्हणजे स्निग्धता आणणारे पदार्थ) सुध्दा बर्याच काळापासून प्रचलित आहेत.
खरखरीत झालेला त्वचेचा भाग स्क्रब करून मऊ करून घ्यावा मग त्यावर क्रिम लावावे. अन्यथा उपयोग होत नाही. अंघोळीच्या वेळेला टाचा स्क्रबरने स्वच्छ घासाव्यात. डायबेटिस पेशंटनी दुखापत होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी. अंधोळ झाल्यावर जरासे ऑलीव्ह ऑईल त्वचेवर सारखे पसरावे किंवा खोबरेल लावावे. हिवाळ्यात केसही कोरडे पडतात. जरासे तेल लावणे हितकर असते.
खरबरीत ड्राय त्वचा व भेंगाळलेल्या हातापायांवर उत्कृष्ट होमिओपॅथिक उपचार घेतल्याने विकार सहज आटोक्यात येतो. व पुनरावृत्ती होत नाही.