बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामीण भागात असलेल्या हलगा येथील मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीस अज्ञातां कडून टार्गेट केले जात आहे.गेल्या दोन वर्षात एक दोन दा नव्हे तर तीन दा या शाळेच्या खोल्यांची मोडतोड अज्ञातांनी केली आहे. मात्र या साऱ्या प्रकारा नंतर देखील पोलिसांनी अध्यापही कोणतीच कारवाई केलेली नाही. पुन्हा एकदा याच मराठी शाळेच्या दोन वर्ग खोल्याची मोडतोड केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार अज्ञातांनी प्रायमरी मराठी शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे कुलूप तोडून कपाटातील साहित्य विस्कळीत करून सामानाची मोडतोड केली आहे.शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना देताच बागेवाडी पोलिसांनी पहाणी केली. हलगा येथील सुवर्ण सौध समोरच्या माळ भागात या प्रायमरी शाळा आहेत. विकृत मानसिकतेतून मराठी द्वेषातून या शाळेच्या खोल्यांना टार्गेट केले जात आहे की काय अशी देखील चर्चा आहे.
हलगा येथे कन्नड आणि मराठी दोन्ही प्रायमरी शाळा आजू बाजूला आहेत मात्र गेले तिन्ही वेळा फक्त मराठी शाळाच अज्ञातांकडून टारगेट केली जात आहेत केवळ मराठी शाळा आहे म्हणून पोलिसांनी देखील शाळा खोल्यावर हल्ले करणाऱ्या कडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप हलगा ग्रामस्थांनी केला आहे.