अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजांना फाटा देऊन एक व्यक्तीने आपल्या नवीन घराची पूजा म्हणजेच वास्तुशांती पाच विधवांच्या हस्ते केली आहे. सुवासिनींना मान देऊन विधवान्ना डावलणाऱ्या तसेच अशुभ मानून मंगल कार्यात बाजूला ठेवणाऱ्या समाजाला एक चांगली शिकवण देण्याचे काम या व्यक्तीने केले आहे.
मानव बंधुत्व वेदिका या नावे त्याने एक संस्था काढली असून राजू मरिगौडर असे त्याचे नाव आहे. बसवणं सौन्दत्ती या गावचा तो रहिवासी आहे. भगवान बसवेश्वर यांचे छायाचित्र हातात घेऊन या विधवांनी सर्वप्रथम त्या घरात प्रवेश केला व पूजन केले.
यावेळी या वेदिकेचे मार्गदर्शक आणि आमदार सतीश जारकीहोळी उपस्थित होते. मरिगौडर आणि त्यांच्या कुटुंबाने हे काम करून समाजा समोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.समाजाने हा आदर्श घ्यावा आणि अंधश्रद्धा तुन मुक्त व्हावे असा सल्ला त्यांनी दिला.
पती वारल्यानंतर पूर्वी विधवेला सती दिले जात होते. ही प्रथा बंद झाली तरी विधवा स्त्री कडे समाजात सन्मानाने पाहिले जात नाही. विधवा महिलेला सगळीकडे दुय्यम स्थान दिले जाते मात्र पतीच्या नंतर हाल अपेष्टा सोसून विधवा स्त्रीच आपले घरदार सावरते, मुला बाळांना घडवते यामुळे अशा महिलांना सर्व कार्यात प्रथम स्थान दिले पाहिजे तरच समाज पुढे जाईल अशी शिकवण या कार्यक्रमातून मिळाली आहे.