तिलारी जलाशयात दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेत बेळगावचे दोन तरुण बुडाले आहेत. सुट्टी असल्याने फिरायला गेले असताना ही घटना घडली आहे.
बेळगाव येथून तिलारी भागात फिरण्यासाठी काही तरुण गेले होते. जलाशयात उतरले असता तोल जाऊन खाली कोसळले असून त्यापैकी दोघे बुडाले आहेत.
बाकीच्या बचावलेल्या तरुणांनी मदतीसाठी धावा केला ते रडत ओरडत रस्त्यावर आले होते पण मदतीला कोणाचं मिळू शकले नाही.
घटनेची खबर चंदगड पोलिसांनाही उशिरा समजली असून ते दाखल झाल्यावरच घटनेची पुढील माहिती मिळू शकणार आहे.गेल्या वर्षभरात तिलारीत फिरायला गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Nice