एका मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी एक ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली आहे.
गोकाक मधील साई मंदिर मार्गावर ही घटना घडली आहे.
सुधाताई मजलीकर (वय ७०) असे तिचे नाव आहे.
दोन तरुण मोटार सायकल वरून आले. त्यांचे चेहरे हेल्मेटने झाकलेले होते. साई मंदिर मार्गावरून चालत असताना अचानक तिच्या गळ्यातील चेन हिसकावून घेण्यात आली आहे.
याबद्दल गोकाक शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Trending Now