येथील मराठी विध्यानिकेतन जवळील मैदानात आज बेळगाव वासीयांनी सीमोल्लंघन केले. वतनदार रणजित चव्हाण पाटील घराण्याने सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्या. शहरातील सर्व थरातील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.
चव्हाट गल्ली येथुन पालखी उत्सवास सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र चौक येथून शहरातील विविध पालख्या सह मिरवणूक निघाली आणि मराठी विद्यानिकेतन जवळील मैदानावर पोचली, तिथे सीमोल्लंघन करण्यात आले.
(फोटो:पीयूष फोटो चव्हाट गल्ली)
नंदी बैल आपट्याच्या पानाच्या ढिगाऱ्यात घुसला मग पारंपरिक पद्धतीनं सोन लुटलं.
दसऱ्याला दरवर्षी या ठिकाणी जत्रेचे स्वरूप येते.यावर्षीही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध मंदिर आणि हिंदवाडी घुमटमाळ येथे येथे देखील सोनं लुटण्यात आलं.
कॅम्प येथील मिरवणूक आकर्षक
बेळगाव शहराच्या कॅम्प भागात तेलगू रहिवासी आणि इतर धर्मीय नागरिक दरवर्षी नवरात्रात दुर्गा मातेचे पूजन करतात.
दसऱ्याच्या दिवशी या मातेची मिरवणूक काढली जाते. पारंपारिक पेहराव आणि विविध सोंगे काढून तरुण दाखल झाले होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
गुरुवारी सायंकाळी पावसाने रिमझिम मारा केला यामुळे खरेदी आणि सोने लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची थोडी गैरसोय झाली.