कचरा उचल करणाऱ्या कॉम्पॅक्टर मधील बिघाड झाल्याने ऐन सणात गेले तीन दिवस कचरा उचल बंद झाली आहे.महानगरपालिकेने योग्य व्यवस्था केली नसल्याने नागरिकांना दुर्गन्ध सहन करावा लागत आहे.
वॉर्ड क्र १६, १७,१८ व १९ मध्ये ही परिस्थिती आहे. दारो दारी कचरा उचल करणाऱ्यांनाही त्रास होत आहे. दुरुस्ती करण्याची यंत्रे बसवून लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी मागील तीन वर्षांपासून करूनही मनपा लक्ष देत नाही अशी माहिती नगरसेवक पंढरी परब यांनी दिली.
कचरा उचल करणाऱ्या कॉम्पॅक्टर दुरुस्तीसाठी सदाशिवनगर येथे सर्व्हिस सेंटर तयार करा अशी मागणी आहे पण ही मागणीही पूर्ण होत नसल्याने खासगी मेस्त्रीवर अवलंबुन राहावे लागत आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे.