बेळगाव शहरा पासून जवळच असलेल्या देसुर गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाले आहे बुधवारी सकाळी सकाळी हा बिबट्याची देसुर कमल नगर भागात दिसल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती.
बिबट्याची माहिती मिळताच खानापूर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी देसुर जवळ जाऊन माहिती जाणून घेतली. बिबटया देसुर कमल नगर जवळील कोणत्या भागात फिरलाय तो।कोणत्या दिशेने जंगलात गेलाय त्याच्या पायाचे निशाणची(foot marks)माहिती मिळाली आहे.
या भागात बिबटया पुन्हा आल्यास ट्रापिंग कॅमेरे (traping camera) बसवण्यात आले आहेत त्यात दिसेल देसुर भागात बिबटया आला असला तरी कसलीही अपायकारक घटना घडली नसल्याची माहिती खानापूर आर एफ ओ बसवराज वळेद यांनी दिली.
ऑक्टोम्बर महिन्यात जंगलातील पाण्याचा स्तर कमी झाल्याने किंवा रस्ता चुकून हे वन्य जीवी देसुर कडे आले असतील अशीही शक्यता आहे.