जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, दुर्गा माता की,चा अखंड जय घोष करीत दुर्गाअष्टमीच्या दिवशी शहरातल्या ताशीलदार गल्ली सह मध्यवर्ती भागात दौड संपन्न झाली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौड च्या माध्यमातून मराठी अस्मितेचे दर्शन घडते आहे सर्वत्र भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे.
अष्टमीच्या दिवशी दर वर्षी ताशीलदार गल्ली विभागाच्या वतीने स्वराजा साठी रक्त सांडलेल्या मावळ्यांच्या वंशजांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात येतो यंदा च्या वर्षी शेलार मामा यांचे वंशज प्रकाश शेलार, शिरीष शेलार व कोंडाजी फर्जंद यांचे वंशज संजय फर्जंद याना आमंत्रित केले होते.
प्रारंभी ताशीलदार गल्लीतील सोमनाथ मंदिर येथे आरती करून प्रकाश शेलार, शिरीष शेलार, संजय फर्जंद यांच्या हस्ते व्यावसायिक प्रकाश चौगुले, नगरसेविका ज्योती चोपडे, रेणू मुतकेकर, वैशाली हुलजी यांचा उपस्थितीत आरती करून दौडीस प्रारंभ करण्यात आला.
शिवकाळातील मावळ्यांच्या वंशजांच्या उपस्थितीने दौडीत सहभागी झालेल्या शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता कपिलेश्वर उड्डाण पूल वरून दौड शनी मंदिर येथे पोहोचली शिवप्रतिष्ठान च्या वतीने वंशजांचा सन्मान करण्यात आला आरती करून ध्येय मंत्र सांगून प्रकाश शेलार, शिरीष शेलार, संजय फर्जंद यांच्या हस्ते ध्वज उतरून दौडी ची सांगता करण्यात आली.
श्वेता शिरीष शेलार 25000
नितीन श्रीकृष्ण कुलकर्णी 5101
सार्व श्री गणेश उत्सव मंडळ अनंतशयन गल्ली टिळक चौक 5001
मनोहर खरूदकर 1111
अनिल फकिरा मुतकेकर 1111 यांनी सुवर्ण सिंहासन साठी कर्तव्यनिधी सुपूर्द केला.
उद्याची दौड
मारुती मंदिर मारुती गल्ली ते धर्मवीर संभाजी चौक.