नवरात्रीत सर्वच मंदिरे सजलेली असतात मंदिरातून भक्तांची गर्दी असते मात्र असे असताना बेळगाव परिसरात चोरट्याकडून मंदिरे टार्गेट केली जात आहेत.
बुधवारी सकाळी जुने बेळगाव येथील एक मंदिरात चोरी तर दुसऱ्या मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. येथील गणेश पेठ मधील गणपती मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.चोरट्यानी या मंदिरातील अंदाजे पाव किलो वजनाचे चांदीचे किरीट लंपास केले आहे.
बुधवारी पहाटे मंदिराचे पुजारी गेले असता त्यांना ही कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना लक्षात आली त्यांनी पंच मंडळी मंदिर अध्यक्ष संतोष शिवणगेकर यांना कल्पना दिली त्या नंतर पोलिसांना देखील याची कल्पना देण्यात आली. तर जुने बेळगाव महादेव नगर मधील व्हलरपप्पा मंदिराचे अज्ञातांनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. जुने बेळगाव परिसरात नशा करणाऱ्या युवकांनी हे कृत्य केले असावे असा संशय लोकांकडून व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी शहापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
मध्यरात्री नंतर मंदिरात चोरीच्या घटना वाढत आहेत काल सांबरा येथील बिरदेव मंदिरात,कंग्राळी बुद्रुक येथील गणेश मंदिरात यमनापूर येथील मारुती मंदिरात चोरी करून चांदीचे दागिने लंपास केले होते.
ऐन सणात मंदिरात मध्य रात्रीच्या वेळी चोरी होत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.