एपीएमसी ते हंदीगनूर रस्त्यासाठी वारंवार निवेदन आणि आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते
त्यामुळे येत्या रविवारी एपीएमसी व्यापारी आणि कंग्राळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार होते.मात्र मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे महिना अखेर कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.
या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. रस्त्यातून प्रवास करताना डोळ्यात धूळ जात असल्याने समस्या निर्माण होत आहेत.
या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. मागीलवेळीही रस्त्यात झाडे लावून सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. यामुळे पावसाळा संपल्या नंतर हा रस्ता करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र खात्यातर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
निवेदना नंतर पुन्हा एपीएमसी मध्ये बैठक घेऊन रविवारी आंदोलन करण्याचे ठरविणार आले होते. मात्र बांधकाम खात्याने महिना अखेर काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, आर आय पाटील, चेतक कांबळे, चंदा पाटील आदी उपस्थित होते.
गेले कित्येक महिने कंग्राळी ग्राम पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील पाठपुरावा करत असताना स्थानिक लोक प्रतिनिधी अधिकाऱ्यांनी डोळ्यांत अंजन घातलेत की झोपलेत अशी देखील चर्चा होत आहे.