एन सी सी च्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराला आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी निवड चाचणीला बेळगावात प्रारंभ झाला.२८ कर्नाटक बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल ए.विवेकानंद यांच्या उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला.एकूण ३८५ कॅडेट्स शिबिरात सहभागी झाले आहेत.
एन सी सी ही देशातील तरुणाची सर्वात मोठी संघटना आहे.एकता आणि शिस्त हे एन सी सी चे ध्येय आहे.कॅडेटसनी आपले ध्येय निश्चित करून ध्येयपूर्ती करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत.प्रशिक्षण शिबिरात मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा कॅडेटसनी चांगला वापर करून घेण्याचे आवाहन शिबिराच्या उदघाटन प्रसंगी लेफ्टनंट कर्नल ए.विवेकानंद यांनी केले.
ए.डी. कामथ, के.यु.बोपन्ना यांची शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका आहे.शिबिरात फायरिंग,नकाशा पाहणे,कवायत आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.