Friday, September 13, 2024

/

‘ते स्वच्छता गृह हटवा अन्यथा आम्हीच पाडवू’

 belgaum

छ. शिवाजी महाराज उद्याना समोरील स्वछतागृह (टॉयलेट) महापालिकेने आगामी दहा दिवसांच्या आत न हटवल्यास आम्ही स्व खर्चाने पाडवू असा इशारा युवा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांची भेट घेऊन निवेदना द्वारे इशारा देण्यात आला.मराठी फलक असलेल्या उद्योजकांना अधिकाऱ्यांनी धमकी देणे तात्काळ बंद करावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.Yuva samiti

छत्रपती शिवाजी उद्यांना समोरील त्या स्वच्छता गृहाने अनेक शिव प्रेमींच्या भावनाना ठेच पोहचत आहे  त्यामुळं पालिकेने शिवाजी महाराजांच्या पुतळा असलेल्या ठिकाणचे टॉयलेट काढावे असं म्हटलं आहे.

महानगर पालिका हद्दीतील सर्व रस्ते, स्वमालकीच्या इमारती आणि कार्यालयांवरील फलक मराठीत सुद्धा लावावे या शिवाय उच्च न्यायालयाने अशी भाषिक सक्ती करता येणार नाही असा निकाल देऊन सुद्धा व्यावसायिक व उद्योजकांना त्यांचे नाम फलक मराठीतले काढुन कानडी लावा नाहीतर तुमचे परवाने रद्द करू अशी धमकी अधिकारी देत आहेत हे तात्काळ बंद करा असे देखील युवा समितीनं निवेदनात नमूद केलं आहे.

यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सचिव श्रीकांत कदम,सचिन केळवेकर,संतोष कृष्णाचे,किरण हुद्दार,अहमद रेशमी, गुंडू कदम, श्रीनिवास हबीब,नम्रता कंग्राळकर,संभाजी सरनोबत,सूरज कुडूचकर,धनंजय पाटील, सुनील बाडीवले, विनायक कावळे,निखिल पठाने, रोहन कंग्राळकर,विकास लगाडे, शुभम भेकने,साईनाथ शिरोडकर,विशाल गौंडाडकर,किशोर मराठे,व्यंकटेश पाटील, गणेश दद्दीकर, चंन्द्रकांत पाटील,महेश जाधव,गजानन किशन,संदीप जक्काने, नागेश नावलगी, बाळू मोटरे, युवराज मलकाचे व इतर उपस्थित होते.

“यावर लवकर कार्यवाही न केल्यास तिथल्या स्थानिक लोकांसोबत युवा समिती तीव्र आंदोलन करून ते स्वछता गृह हटवायचे काम मार्गी लावेल तसेच मराठी व्यापारी व उद्योजकांच्या मागे ठाम पणे उभी राहील”
शुभम शेळके
अध्यक्ष युवा समिती

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.