रस्त्याचा काँक्रीटीकरणामुळे झाडांची मुळे कमकुवत होत आहेत. याचा परिणाम झाडांवर होत असून झाडे उन्मळून पडण्याच्या घटना मागील ५ वर्षांपासून वाढल्या आहेत. त्यामुळे झाडांना भक्कमपणा यावा यासाठी बुंध्याभोवती लोखंडी झालर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
पर्यावरण अबाधित राखण्यासाठी प्रशासन विविध प्रयत्न करत आहे. मात्र जुन्या झाडाची कत्तल करण्यासाठी कोणत्याही गोष्टी विचारात घेण्यात येत नाहीत. रस्ते करताना हमखास असे प्रसंग घडतातच. डाँबर किव्हा काँक्रीटीकरणामुळे अनेक झाडांचे आयुष्य कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने जुनाट किंवा नवीन झाडे वाचविण्याच्या दृष्टीने आतापासून लोखंडी झालर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर तसेच उपनगरी भागात अशा घटना घडताना आहेत. त्यामुळे रस्ते करताना झाडांचाही विचार करण्याची खरी गरज आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर अनेक झाडांची कत्तल होण्यापासून व झाडांची वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रत्येक झाड जगले पाहिजे अशी प्रशासनाची भूमिका असली तरी प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. याचा विचार करून जर झाडे भक्कम उभी हवी असतील तर यासाठी झाडांच्या सभोवती लोखंडी झालर असणे आवश्यक असे अनेक जागृकांचे मत आहे.