प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये यापुढे मराठीतूनच कागदपत्रे मिळावीत अशी मागणी तालुका पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी याला आडकाठी घालण्यासाठी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी विरोध केला मात्र सर्व मराठी सदस्यानी विरोध करताच याबाबत विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले.
तालुका पंचायत पीडिओ आणि तालुका पंचायत सदस्य यांची बैठक घेण्यात आली यावेळी ही मागणी करण्यात आली. ही मागणी रास्त आहे. बेळगावात बहुभाषिक मराठी नागरिक राहतात.
जर प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये मराठी कागदपत्रे मिळाली तर अनेकांची सोय होणार आहे. यवहार विचार करून कागदपत्र मराठीत द्द्यावीत अशी मागणी करण्यात आली
ही मागणी करत असताना अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी याला विरोध करून प्रत्येक बैठकीत हा विषय मांडणे योग्य नाही असे सांगितले. मात्र हा आमचा हक्क आहे त्याला विरोध करू शकणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे अध्यक्ष यांनी माघार घेत यापुढे सांगू असे आश्वासन दिले.
त्यानंतर मराठी सदस्यांनी बैठकीत सर्व ग्राम पंचायत मध्ये मराठीत कागद पत्रे देण्यात यावीत असे सांगितले. यावेळी सदस्य सुनील अष्टेकर, आबासाहेब कीर्तने, रावजी पाटील, वसंत सुतार, लक्ष्मी मैत्री, मनीषा पालेकर आदी उपस्थित होते.