उद्योग खात्री योजनेत भ्रष्टाचार आणि तालुका पंचायत सदस्यांना देण्यात येत नसलेल्या आदरामुळे तालुका पंचायत सदस्य आणि पीडिओ बैठक चांगली गाजली. यापुढे प्रत्येक ग्राम पंचयातीमध्ये जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि आमदार यांना आदर देण्याचा सल्ला यावेळी करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी, कार्यकारी अधिकारी पदमजा पाटील, सहायक सचिव मालिकार्जुन कलादगी होते. यावेळी अनेक पीडिओना चांगलेच धारेवर धरण्यात आले आणि त्यामुळे यापुढे सदस्यांचा व्यवस्थित आदर राखा अश्या सूचना देण्यात आल्या.
अध्यक्ष पाटील यांनी यापुढे जर कोणत्याही पीडिओनी तालुका पंचायत सदस्याना मान दिला नाही तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे प्रत्येक पीडिओनी विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यक्रमात तालुका पंचायत सदस्यांना बोलवा असे सांगण्यात आले.
वस्ती योजनेत प्रत्येक ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे प्रत्येक पीडिओनी कोणकोणत्या योजनेतून घरे मंजूर झाली आहेत त्यांची माहिती येत्या बैठकीत देण्याचे सांगितले. काही गावात एकाच घरात दोन दोन घरे मंजूर करण्यात आली आहेत त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील पीडिओ व अधिकारी उपस्थित होते.