आमदार सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील समेट घडल्याने एपीएमसी निवडणूक बिनविरोधी झाली आहे. अध्यक्षपदी अनंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात करण्यात आली आहे. सुधीर गड्डे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
एपीएमसीच्या मागच्या अध्यक्ष निवडीत वर्चस्वावरून वाद झाला होता. यानंतर पीएलडी बँकेच्या अध्यक्ष निवडीवरूनही मोठा वाद झाला होता त्यावरून कर्नाटक सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. असा वाद करून पक्षाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याने यावेळी समंजस्याने निवड करण्यात आली आहे.
सतीश जारकीहोळी यांनी काहीही झाले तरी मराठी माणूस अध्यक्ष करणार असे जाहीर करून आपला शब्द पूर्ण केला आहे. अध्यक्षपदाची माळ तानाजी पाटील यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा होती त्यांचं पारडं जड असे मानले जात होते पण ऐनवेळी हे नाव मागे पडले.समिती कडून अर्ज देखील दाखल करण्यात आला नाही त्यामुळं ही निवडणूक बिन विरोध झाली.
युवराज कदम यांचेही नाव पुढे होते पण समझोत्याच्या राजकारणात त्यांनाही डावलण्यात आले आहे. अनंत पाटील (बेंनाळी होनगा) यांना जारकीहोळी ब्रदर्स नी पाठिंबा दिला.पाटील हे सतीश जारकीहोळी समर्थक तर सुधीर गड्डे हे अक्का समर्थक आहेत.