देशाच्या रक्षणासाठी नवरात्रीत शिव प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे स्वागत कॅम्प मधील मधील मुस्लिम बांधवांनी करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केलाय.
सोमवारी दौड कॅम्प भागातून गेली त्यावेळी कॅम्प मधील कै दावल जंगू शेख परिवाराच्या वतीनं कॅटोंमेंट सदस्य साजिद शेख यांनी दौडीत सहभागी युवकांसाठी अल्पोपहार आयोजन केले.पाणी बाटल्या हजार केळी स्टॉल लावून वितरण करण्यात आली.
दौड स्वामी बेकरी मारुती मंदिरा जवळ येताच साजिद शेख आणि इतर मुस्लिम बांधवांनी हार घालून भगव्या ध्वजाचे स्वागत केलं.
सर्व जाती धर्माचे लोक चांगले वागले पाहिजे जातीय सलोखा समाजात नांदला पाहिजे असा सामाजिक सौहार्द तेचा संदेश घेऊन कॅम्प मधील मुस्लिम बांधवांनी केलेलं कार्य केले असून कोल्हापूर प्रमाणे बेळगावात देखील सलोखा असला पाहिजे अशी भूमिका साजिद शेख यांनी मांडली. यावेळी वाहिद शेख, बाशा शेख,किरण निपाणीकर,बशीर सनदी साबीर शेख,खालिद सनदी पप्पू मिरजकर,नजीर शेख,शिंपी समाज पंच राजेंद्र जवळकर आदींनी या कामी पुढाकार घेतला होता.