एपीएमसी ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्ष पदावर शेतकरी असावा अशी प्रामाणिक इच्छा असते. यामुळे पक्ष आणि भाषिक वाद गौण ठरवून एपीएमसी अध्यक्ष निवड बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अध्यक्ष मराठी की कन्नड, समितीचा काँग्रेसचा की भाजप चा असे भेदभाव न करता तो शेतकरी असावा असा विचार पुढे आला आहे.
माजी पालकमंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी हा विचार केला असून निवडणूक घेण्यापेक्षा सर्वांच्या संमतीने अध्यक्ष निवड करण्याच्या चर्चा सुरू आहेत.
सध्या निंगप्पा जाधव हे अध्यक्ष आहेत. ते बदलले जाऊन नवीन अध्यक्ष करताना हे सूत्र विचारात घेतले जाणार आहे.
उद्या सोमवारी सकाळी ही ए पी एम सी अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.काँग्रेसचा एक गट काँग्रेस सक्रिय सदस्याला करण्यासाठी जोरदार लॉबिंग करत असला शेवटी सतीश जारकीहोळी आणि जारकीहोळी बंधू कुणाच्या गळ्यात माळ घालतात त्यावरच बरेच काही अवलंबून आहे. समितीचे देखील सदस्य काय करतात त्यांची भूमिका काय याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.