लढा नाही तर… गुलामगिरीची सवय होईल…
हीच टॅग लाईन असणार आहे या वर्षीच्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीची…
युवा समितीच्या वतीनं याचं वाक्याला पुढे करत काळ्या दिनाची जनजागृती केली जाणार युवकात स्फूर्ती आणि नवचैतन्य आणलं जाणार आहे. संघटना सचिव श्रीकांत कदम यांनी काळ्या दिनाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या काळ्या टी शर्ट वरील घोषवाक्य सुचवित यावेळची टॅगलाईन असेल असा ठराव मांडला हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
रविवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक महागणपती देवस्थान लक्ष्मीरोड शहापूर बेळगाव येथे संपन्न झाली अध्यक्ष स्थानी अध्यक्ष शुभम शेळके होते.
सचिव श्रीकांत कदम यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त आणि आजच्या बैठकीच्या विषयाची माहिती दिली.
सचिन केळवेकर यांनी छ. शिवाजी महाराज उद्यान समोरील सार्वजनिक मुतारी हटविण्यात यावी कारण त्यामुळे परिसरात दुर्गंधी, आणि उद्यानाचे पावित्र्य नष्ट होत आहे, तसेच बालक आणि महिलांचा वावर उद्यान परिसरात जास्त असल्याने महानगर पालिकेने सदर मुतारी हटवून इतर ठिकाणी मुतारीची व्यवस्था करावी असा ठराव मांडला सदर ठराव सर्वानुमते तो मान्य करून येत्या मंगळवार दि. 16/10/2018 रोजी सकाळी 10.30 वाजता महानगर पालिका आयुक्त,महापौर आणि उपमहापौर याना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.
काही कानडी संघटनाच्या दबावाला बळी पडत मराठीसह तिन्ही भाषेतील बोर्ड काढण्यात येत आहेत किंवा काढले आहेत ते त्वरित बसवावेत आणि व्यावसायिकांना जे कानडी भाषेत बोर्ड करावेत ही सक्ती करण्यात येत आहे ती उच्च न्यायालयाने धुडकावली आहे त्यामुळे व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाने सुद्धा तगादा लावू नये असा ठराव करण्यात आला.
साईनाथ शिरोडकर याने पंतप्रधान यांच्या नावे सीमाप्रश्नाचा खटला लवकर मार्गी लावावा आणि प्रश्न सोढविण्यासाठो प्रयत्न करावेत यासाठी सर्वानी पत्र मोहीम सुरू करावी असा विचार मांडला.
शुभम शेळके यांनी काळ्या दिवसाची आणि सिमाप्रश्नाची सोशल मीडियावर मोठया प्रमाणात जागृती करावी पण ती करताना संयम राखावा आणि प्रक्षोभक लिखाण करू नये असे निवेदन केले.
या व्यतिरिक्त आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला राजू कदम, मंगेश पाटील, विनायक कावळे, चंद्रकांत पाटील, व्यंकटेश पाटील, अहमद रश्मी,किरण हुद्दार, रोहित गोमानाचे, अभिजित मजुकर, निर्मल धाडवे, राहुल हुलजी, संकेत रवळोजी, परशराम कुंडेकर, सुरज चव्हाण, महेश जाधव,मंगेश बाळेकुंद्री, अंकुश केसरकर,आणि इतर युवक उपस्थित होते.