संगीत ही माणसाची आवड आहे. बेळगावचे संगीत क्षेत्रही तसे जुने आहे आणि नवीन तंत्र आत्मसात करत घडलेले आहे. शास्त्रीय संगीतापासून आधुनिक संगीत क्षेत्रपर्यंत येथील गायक आणि संगीतकारांनी प्रगती केली आहे. एकच कमतरता होती ती संगीत रेकॉर्ड करणाऱ्या स्टुडिओची. या कामासाठी मुंबई, कोल्हापूर, पुणे किंव्हा बेंगळूरची वाट धरावी लागत होती. ही कमतरता अजिंक्य कुडतुरकर या तरुणाने भरून काढली आहे.
बेळगावातील संगीताच्या वेव्ह ला अधिक बळकट करण्याचे काम त्याचा वेव्हस्ट्रीम स्टुडिओ करत आहे.
दुसरे गेट टिळकवाडी येथे हा स्टुडिओ असून त्यात संगीत रेकॉर्डिंग साठी लागणारी सर्व आधुनिक यंत्रे आहेत.संगीत व फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लागणारी सर्व गोष्टी त्याने आणल्या आहेत. लहान पणापासूनच संगीताची आवड असल्याने त्याने याच क्षेत्रात करियर करायचे ठरवून आपला स्टुडिओ उभा केला असून आता बेळगाव आणि हुबळी, संकेश्वर, चिकोडी व कोल्हापूर पर्यंतचे लोक त्याच्या स्टुडिओत येत आहेत.
आजवर त्याने १४० प्रोजेक्ट केले आहेत. बॉलिवूड च्या धडक चित्रपटासाठी त्याने केलेल्या कामासाठी देशभर त्याचे कौतुक झाले आहे. अनेक उदयोन्मुख व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट साठी तो एक आधार ठरला आहे. नवीन गाणे किंव्हा अल्बम करणाऱ्या तरुणांसाठी तर तो आधार आहेच. अशा अजिंक्य याला भरपूर शुभेच्छा.