बेळगाव शहरातील एकमेव अशा सर्व नागरिकांसाठी सोईच्या असणाऱ्या शिवाजी गार्डन चा वाली कोण आहे? हा प्रश्न सकाळच्या वेळी व्यायामाला जाणारे लोक विचारत आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी बसवलेल्या व्यायाम सामानाची मोडतोड झालेली असून ते दुरुस्त करणे, नवीन आणून बसवणे या कामावर कोणाला नेमले आहे हेच माहीत नसल्याने नागरिकांना काहीच उपयोग होऊ शकत नाही.
काही वर्षांपूर्वी गार्डन मध्ये मिनी जिम बसवण्यात आली आहे. पण या जिम मधील वॉकर व इतर साहित्य खराब झाले आहे.
सकाळी चालण्यासाठी जाणाऱ्या तरुण वर्गाला याचा उपयोग व्हावा असा उद्देश होता पण दुर्लक्ष केल्याने तो साध्य होत नाही.
बेळगाव शहराच्या दक्षिण भागातील नागरिक या गार्डन मध्ये सकाळी व संध्याकाळी जमत असतात, याचा विचार करून तरी नागरिकांची सोय होण्यासाठी दुरुस्ती काम करावे आणि व्यायाम साहित्य नवीन आणून बसवावे ही मागणी होत आहे.