Monday, November 18, 2024

/

‘नेहरू नगर सदाशिवनगरात शिवरायांचा गजर’

 belgaum

भगवेमय वातावरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने नेहरू नगर, सदाशिव नगर परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीच्या चौथ्या दिवशीचे!

शनिवारी सकाळी पडलेल्या गुलाबी थंडीत आणि धुक्यात शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन देव,देश,धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दौडी मध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महिलांनी काढलेल्या रांगोळ्या, शिवप्रेमींन वर होणारी पुष्प वृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनले होते.

Nehru ngr bgm

नेहरू नगर येथील बसवाण्णा मंदिर येथून दौडीस प्रारंभ झाला. शंकरगौडा पाटील आणि एन बी खांडेकर यांच्या वतीने आरती करून ध्वज चढवण्यात आला. सदाशिव नगर, नेहरू नगर, सुभाष नगर, गँगवाडी, रामनगर, अशोक नगर, शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर येथी दौडीची सांगता करण्यात आली या वेळी बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, आणि माळमारुती पोलीस स्थानकाचे चे गड्डेकर यांचा हस्ते आरती करून ध्वज उतरवण्यात आला.

सुवर्ण सिंहासन साठी निधी
शिव शक्ती कन्स्ट्रक्शन चे उमेश लक्ष्मण चौगुले यांनी ₹15000 तर यशस्वीनी महिला मंडळ च्या वतीने ₹ 5001 चा धनादेश श्री शिवप्रतिष्ठान च्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आला.

उद्या ची दौड
अंबामता मंदिर शहापूर ते बसवेश्वर चौक गोवावेस..

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.