बेळगावचे जिल्हाधिकारी पदी काम केलेले आय ए एस अधिकारी एस झियाउल्ला यांची बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड च्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी निवड झाली आहे.
जिल्हाधिकारी पदावरून त्यांची अचानक बदली झाली होती आणि कोणतेच पद त्यांना देण्यात आले नव्हते. पण त्यांची आता घर वापसी झाली आहे.
एस झियाउल्ला हे निरुपद्रवी जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जात होते.
त्यांची बदली अचानक झाल्याने काही नागरिकांनी हुरहूर व्यक्त केली होती पण पुन्हा ते बेळगावला पोस्टिंग घेऊन आले आहेत.
आत्ता ते स्मार्ट सिटीची कामे किती स्मार्टपणे करणार याकडे बेळगावकर लक्ष ठेवून राहतील.