बैलहोंगल तालुक्यातील नेसर्गी पोलीस स्थानक हद्दीतील तीन मटका व जुगार प्रकरणातील आरोपींवर गुंडा लावण्यात आला आहे. त्यांना आता बंगळूर च्या पराप्पन अग्रहार कारागृहात पाठवण्यात आले आहे.
कल्लाप्पा भीमराय टोपगी(वय ५०) रा. देशनूर, कल्लाप्पा मल्लप्पा सुकद( वय ५०) रा. नागनूर आणि रमेश आडीवेप्पा कब्बू( वय २८) रा. यरगुद्दी ही त्यांची नावे आहेत.
या तिघांवरही मटका व जुगार प्रकरणात ५ ते १० गुन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे व सरकारने १२ दिवसात मंजूर केल्यानंतर सल्लागार मंडळाकडे जाणार आहे.