कृषी उत्पन्न बाजार समिती ए पी एम सी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुक जस जशी जवळ येऊ लागली आहे तस तशी रंगत देखील वाढू लागली आहे.एकूण तीन सरकार नियुक्त सदस्या पैकी दोन मराठा समाजाच्या सदस्यांना यावेळी सरकार नियुक्त ए पी एम सी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने बसवंत मायनाचे(कडोली)मनोहर बेळगावकर(बिजगरणी) आणि रेणुका माळगी(हुदली)यांची नियुक्ती करण्यातआली आहे.वरील तीन पैकी दोघे जण जारकीहोळी समर्थक तर एक जण हेब्बाळकर समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
एपीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून येत्या 17 रोजी होणार आहे.15 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 20 महिन्याचा कार्यकाळ संपला आहे.एपीएमसी च्या अध्यक्ष पदासाठी 17 जणांना मतदानाचा अधिकार आहे. 11 निवडूण आलेले 3 स्थानिक संस्था मधून आलेले तर तीन सरकार नियुक्त असे 17 जण मतदान करणार आहेत.
माजी मंत्री यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी अगोदरच मराठा समाजाला अध्यक्षपद देऊ असं जाहीर केले आहे.त्यातच होणारा अध्यक्ष हा मूळ काँग्रेसचा मराठा की समितीचा मराठा असणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.लोकसभा निवडणूक समोर असल्याने मराठी मते मिळवण्यासाठी समिती मधल्या एका मराठा समाजाला हे पद मिळू शकते अशी देखील दाट शक्यता आहे या सगळ्या राजकारणात अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.